मुलगी झाली म्हणून सुनेला मारहाण करून….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या चांदशी या भागात महिलेला मुलगी झाल्याने तिला मारहाण करून माहेरी पाठवल्याची घटना समोर आली आहे.

लग्न झाल्यानंतर पहिलीच मुलगी झाली याचा राग मनात धरून सासू-सासरे आणि पतीने महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती दिनेश सोनावणे, सासरे भीमराज महादू सोनवणे, सासू शोभा सोनवणे आणि दीर व नणंद यांनी मुलगी झाली त्या दिवसापासून आम्हाला मुलगाच पाहिजे होता असा अट्टाहास सुरु केला. त्यानंतर कुरापत काढत तुला स्वयंपाक येत नाही. माहेरून दोन लाख रुपये आणले तरच घरात ये अशी धमकी दिली. तसेच तसेच विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असेही तक्रारीमध्ये नमूद केले आहे.