मास्क लावण्यास सांगितले म्हणून पोलीस शिपायाला केली बेदम मारहाण : घटना म्हसरूळची

नाशिक (प्रतिनिधी) : म्हसरूळ परिसरात आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.१८) रात्री घडली. पुष्पक नगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ या परिसरात राहणारे धनराज लांडे (२१, रा.विश्वाकर्मा अपा.), सुशांत खरे (१९, साई श्याम, अपा). फैजल शेख (१७,विश्वेश्वरी अपा.), विठ्ठल साळवे (१७, विश्वेश्वरी अपा.) अशी आरोपींची आहेत.

हे चार जण म्हसरूळ येथील गणपती मंदिरासमोरील गार्डन जवळ संचारबंदी आदेशाचे पालन करून मास्क न लावता, विनाकारण रस्त्यावर फिरत होते. यावेळी पोलीस शिपाई जिभाऊ चौरें हे संबंधित ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी चौघांना मास्क लावण्यास सांगून घरी जाण्यास सांगितले म्हणून राग येऊन त्यांनी पोलीस शिपायाला दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या सरकारी गणवेशाचे नुकसान सुद्धा केले.