मास्क न वापरणाऱ्यांवर करणार दंडात्मक कारवाई – पालिका आयुक्त कैलास जाधव

नाशिक (प्रतिनिधी) : एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे तर दुसरीकडे नागरिक बेजबाबदारपणे वावरतांना दिसताय. अनलॉक टप्पा सुरु झाल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दी करतानाचे चित्र दिसतंय. त्यामुळे नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याचे लक्षात घेता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कठोर पाऊले उचलावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याशी चर्चा करून मास्क वापरणे बंधनकारक करण्यावर निर्णय घेणार आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र नागरिक स्वतःची काळजी घेत नसून मास्क न वापरता घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी न घेणाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारण्यात येईल. शिथिलता देण्यात असली तरीही काळजी घेणे महत्वाचे आहे म्हणून प्रशासानाची सक्ती आता पुन्हा जोर धरणार आहे. अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.