मास्कच्या दंडाविषयी आयुक्तांचा नवीन फंडा!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात कोरोना रुग्णाची संख्या आवाक्याबाहेर जात असताना अनेक नागरिकांचे बळी जात आहे. नाशिक शहरातील नागरिक विनामास्क फिरत असल्याने मंगळवारी (दि.१५) झालेल्या महासभेत महापौरांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांनाकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनामुळे सर्वच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी एकंदरीत सर्वच परिस्थिती पाहता दोनशे रुपये दंड आकारणीचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची शहरातील विभागीय अधिकाऱ्यांमार्फत सहाही विभागात अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका क्षेत्रात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्या साठी मास्क लावणे अनिवार्य असल्याने इतरही साध्या उपाययोजना परिणामकारक आहेत. आताची आर्थिक परस्थिती लक्षात घेत दंडाची रक्कम कमी करण्यात आलीं आहे. पण दंडापेक्षा शिस्त महत्वाची आहे. त्यामुळे शिस्त पाळा असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.