‘माझ्याकडून अभ्यास होत नाही, तुमच्या व माझ्या फायद्यासाठी घर सोडतोय’ अशी चिट्ठी लिहून…

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील उपनगर परिसरात एका मुलाने अभ्यास होत नाही. म्हणून चिठ्ठी लिहून घर सोडले. उपनगर परिसरातील रहिवाशी सचिन तुकाराम हांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१ नोव्हेंबर) रोजी हांबरे यांचा मुलगा घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. तो अद्याप घरी परतलेला नाही.

दरम्यान हांबरे यांना एक चिट्ठी आढळून आली. त्यामध्ये त्यांच्या मुलाने ‘मला अभ्यास होत नाही. तुमच्या व माझ्या फायद्यासाठी मी घरातून निघून चाललो आहे.’ मी फोन करेन. असे लिहिले होते. हांबरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाला कोणीतरी फूस लावली असून, त्याचे अपहरण झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.