माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा ट्रेकिंगदरम्यान दुर्दैवी मृत्यू….

नाशिक (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यात ट्रेकिंग साठी गेलेले माजी रणजीपटू आणि महराष्ट्र संघाचे प्रशिक्षक शेखर गवळी यांचा तोल गेल्याने पाय घसरून दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना काल (दि.०१) घडली. संध्याकाळी अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तब्बल ३ तासांच्या प्रयत्नानंतर शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला.