मागण्या पूर्ण न केल्यास परिचारिकांचा आंदोलनाच ईशारा!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवेवरील परिचारिकांचा ताण लक्षात घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी जिल्हा रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी सर्व नर्स असोसिएशन च्या परिचारिकांनी घोषणाबाजी करत दोन तास काम बंद ठेवत आंदोलन करून निषेध नोंदवला. परिचारिकांना आठवडाभर ड्युटी अन् पुढील आठवड्यात गृह विलगिकरण करण्यात यावे.

तसेच परिचारिकांना दररोज कामाचे चार तास देण्यात यावे. कोविड-१९ चे संक्रमण लक्षात घेऊन परिचारिकांची अतिरिक्त भरती करावी. त्यांच्या निवास आणि भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांना 300 रुपय प्रमाणे भत्ता मिळावा. गृहविलगिकरण काळात परिचारिकांची कोरोना नमुना चाचणी केली जावी. त्यांच्या नातेवाईकांना सह त्यांना रुग्णालयात 20% जागा राखीव ठेवावी एखाद्या परिचारिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास वारसांना 50 लाख रुपयांचा विम्याचा लाभ मिळावा. त्याच प्रमाणे अनुकंप तत्वावर नोकरीत सामावून घेणे अशा प्रकारच्या मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न केल्यास परिचारिकांनी आंदोलनचा करण्याचा ईशारा सुद्धा दिला आहे.