महिलेवर गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार ; नाशिकरोडची घटना

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड परिसरात राहणाऱ्याएका महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना काल (दि.२९) घडली आहे. मोडेलिंगचे आमिष दाखून संशयित तिला घरी घेऊन गेला. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा आपत्तीजनक व्हिडीओ काढला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आफताब मन्नान शेख उर्फ विकी शर्मा असे संशयित आरोपीचे नाव आहे. हा आद्केनगर, देवळाली कॅम्प येथील रहिवासी आहे. त्याने पिडीत महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर मोडेलिंगमध्ये करिअर करून देतो असे आश्वासन देऊन तिच्या घरच्यांचाही विश्वास संपादन केला. काल (दि.२९) तिला घरी नेऊन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचे आपत्तीजनक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करेल अशी धमकी दिली.