महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केल्या एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर….

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना काळामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार होत्या. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या परीक्षा पुढे ढकलल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

अखेर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० या 14 मार्च २०२१ रोजी घेण्यात येतील. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल असे आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.