महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा शुक्रवारी ऑनलाइन दीक्षांत समारंभ

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २०वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी (दि. २९) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या ऑनलाइन दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशनुख ऑनलाइन उपस्थित राहणार आहे.

विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी सांगितले की, दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले असून या समारंभात ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या ८०४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.

विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ८ सुवर्णणदक पदक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व संशोधन पूर्ण तीन विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दीक्षांत समारंभाचे https://t.jio/muhs2021 वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी,पालक व अभ्यागतांनी सदर दीक्षांत समारंभाचे प्रक्षेपण ऑनलाइन पहावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.