महाराष्ट्राच्या जमीनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची तहाण भागेल यासाठी प्राधान्य ठरवून प्रकल्पांची कामे हाती घेण्यात यावीत. सिन्नरला पिण्याच्या पाण्याचाच मुलभूत प्रश्न आहे, त्यासाठी नियोजित योजनांची कामे सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्राच्या जमीनीवर पडणारे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही अथवा लिहून देणार नाही. राज्याच्या हक्काचं पाणी राज्यातच रहायला हवे. आमदारांनी सुचवलेल्या छोट्या प्रकल्पांची कामेही तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.