महामंडळाच्या ऑनलाईन लिलावात नाशिक उत्पन्नाच्या बाबतीत राज्यात अव्वल !

नाशिक (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाचा जुन्या निकामी बस व भंगार सामानाचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात आला. या लिलावातून राज्य परिवहनमंडळाला ६ कोटी ४५ लाख ८० हजार एवढे उत्पन्न मिळाले. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील लिलाव झाला होता परंतु, त्यात नाशिक उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल ठरले आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून लिलाव झाला नव्हता, त्याआधी लिलाव झाला होता परंतु, तो त्रयस्थ यंत्राने मार्फत केला जायचा. यावर्षी महामंडळाने स्वतः लिलाव केल्याने सर्व उत्पन्न महामंडळाकडे राहिले आहे. यामध्ये लिलावास पात्र असलेल्या ५३ व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. लिलावात एकूण १५७ प्रकारचे लिलाव लॉट लावण्यात आले होते. महिन्याभरात पेठरोडवरील एसटी कार्यशाळेत लिलावासाठी काढण्यात आलेल्या सामानाचे लॉट लावण्याचे काम महामंडळाचे कर्मचारी करत होते.