महापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….

नाशिक (प्रतिनधी) : नाशिक शरात कोरोनाचा संसर्ग वाढत दिवसेंदिवस चालला आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटर मिळण्यासाठी धडपड करत आहेत. काहींना तर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने जीव गमवावा लागत आहे. मात्र दुसरीकडे महापालीकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात चक्क १५ व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

पीएम केअर फंडा मार्फत मिळालेले व्हेंटिलेटर बिटको रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर धुळीत पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. केवळ २३ किलो लिटर दाबाची टाकी मिळत नसल्याने गेल्या महिनाभरापासून वापरा विना व्हेंटिलेटर पडून आहेत. मात्र यावर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील रुग्णालयात व्हेंटिलेटर पुरेसे प्रमाणात उपलब्ध असून कोणतीही टंचाई भासत नसल्याचे स्पष्टं केले आहे.