महापालिकेच्या कार्यालयात ‘नो मास्क, नो एंट्री’

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसून काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात ‘नो मास्क, नो एंट्री’ चे पोस्टर लावले आहे. याआधी दिवाळीच्या खरेदीसाठी होत असलेली गर्दी बघता महापालिकेने व्यावसायिकांना दुकानाबाहेर ‘नो मास्क, नो एन्ट्री’ लिहिलेले फलक लावण्याचे आदेश दिले होते. मात्र महापालिका कार्यालयातच हे फलक लावले नसल्याची जोरदार चर्चा होत होती. अखेर हे फलक लावण्यात आले असून ‘देर आये, दुरुस्त आये’ अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक