महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत गोंधळ!

नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या बदलीवरून ऑनलाईन महासभेत सदस्यांनी आक्रमक होत प्रशासनाला जाब विचारला. कोरोनाकाळात सुद्धा सफाई कामगारांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. असे असूनसुद्धा त्यांची बदली झाल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बदल्यांमुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. सध्या रिक्षा आणि बसेस बंद असल्याने बदलीच्या ठिकाणी पोहोचतांना उशीर होतो आणि प्रशासन कोणतेही कारण समजून घेत नाही.

वय वर्ष ५० आणि त्यापुढील वयाच्या सफाई कामगारांना जवळपासच्या भागातच नियुक्ती दिली जाणार आहे. आणि कंत्राटी सफाई भरतीत घेतलेल्या रकमेबाबत संबंधित ठेकेदारावर काय कारवाई झाली असा प्रश्न सदस्यांनी विचारला असता त्याची दखल घेणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.