महापालिका देणार १४ हजारांचा दिवाळी बोनस!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनामुळे महापालिका आर्थिक चणचणीत सापडली असली तरी या कोविडच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनतीने काम केले. या कामाचा मोबदला म्हणून दिवाळीनिमित्त १४ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे.

कोरोनाच्या या कठीण काळात आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. सुरुवातीला आयुक्त कैलास जाधव यांनी सात हजार रुपये अनुदान देण्याची संमती दिली होती. त्यानंतर बुधवारी (दि.२८) महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त कैलास जाधव यांच्यात झालेल्या बैठकीत प्रत्येकी १४ हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले.