मराठा संघटनेकडून अॅड.सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक(प्रतिनिधी): खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी बोलताना अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी एका वाहिनीवर वादग्रस्त विधान केले, म्हणून नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.८ऑक्टोबर) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात  विरोध करणारे अॅड.सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्यामुळे नाशिकमध्ये मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्याप्रसंगी क्रांती मोर्चाचे करण गायकर, तुषार गवळी,चेतन शेलार, नीलेश शेलार, तुषार जगताप, गणेश कदम, अस्मिता देशमाने, माधुरी पाटील इत्यादी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरून सदावर्ते  यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली होती तसेच आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.