नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यांनतर समाजात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. तसेच स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने काही निर्णय दिले असले तरी समाजात यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर चर्चा करून संभ्रम दूर करण्यासाठी उद्या (दि.२६) सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे. नाशिकमधील पंचवटी भागात औरंगाबादरोडवरील मधुरम हॉल येथे ही बैठक सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या नाशिकमध्ये महत्वाची बैठक….
4 months ago