मनसे प्रमुख राज ठाकरे अयोध्येला जाणार ! नाशिकमध्ये जल्लोष !

नाशिक (प्रतिनिधी): राज ठाकरे यांनी अयोध्याला जाणार असल्याची घोषणा केल्या नंतर आज नाशिकच्या मनसे कार्यालयात मनसे कार्यकर्ते मध्ये जल्लोष पहायला मिळला. मनसे कार्यकर्त्यांनी प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची पूजा करून फटाके फोडत मिठाई वाटप करून आनंद साजरा केला.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली या बैठकीत राज ठाकरे यांनी आपण लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांच्या सोबत नाशिक जिल्ह्यातून शेकडो  कार्यकर्ते अयोध्याला जाणार असल्याचे मनसे सैनिकांनी सांगितले