मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर !

नाशिक (प्रतिनिधी): खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ४ मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचा सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, मनसे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार,मनविसे नाशिक जिल्हाध्यक्ष शाम गोहाड यांनी राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंज ह्या निवासस्थानी भेट घेतली, यावेळी सदर दौऱ्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.