नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक पूर्व विभागाचे काही विभाग पंडित कॉलनीत आहे. आणि काही विभाग मेनरोड येथील कार्यालयात होते. त्यामुळे नागरिकांची हेळसांड होत होती. तसेच मेनरोड येथे असलेल्या महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीची पडझड सुरु झाल्याने अशा धोकादायक ठिकाणी अधिकाऱ्यांना काम करावे लागत होते. आणि तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पंडित कॉलनी येथे असलेल्या महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात पूर्व विभागाचे काम स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ जानेवारी पर्यंत हा विभाग पंडित कॉलनीत स्थलांतरित करण्याचे आदेश विभागीय अधिकारी सुनील मुदळवडकर यांनी दिले आहेत.
मनपाचा पूर्व विभाग पंडित कॉलनीत स्थलांतरित ; नागरिकांसाठी दिलासादायक बाब
2 years ago