मध्यरात्री गोडाऊन फोडून १८ लाखांचा ऐवज लंपास!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. यामध्ये चोरी, विनयभंग, मारहाण, सायबर गुन्हे अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. काल (दि.२२) मध्यरात्रीच्या सुमारास इलेक्ट्रोनिक वस्तूंचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी १८ लाखांची चोरी केल्याची घटना घडली. गोडाऊन मधील महागडे टीव्ही आणि एसी चोरट्यांनी चोरून नेले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरटे चोरी करून फरार झाले आहेत. यासंदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.