मखमलाबाद परिसरात घरफोडी; पळवला ६३ हजार किमतीचा मुद्देमाल !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील मखमलाबाद परिसरात अज्ञात चोरटयांनी घराचा दरवाजा तोडला. दरम्यान, घरातून ६३ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमराव भिकाजी भंडागे (वय ३२) हे रामकृष्ण नगर, शांतीनगर, मखमलाबाद परिसरात राहतात. दि.२४ डिसेंबर २०२० ते दि.१२ जानेवारी २०२१ रोजी घरात कोणी नसताना याची संधी साधत, चोरटयांनी बंद घराचे मुख्य दार तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातून ३० हजार किमतीचे कानातले, १५ हजार किमतीच्या २ अंगठ्या व १८ हजार रोख रक्कम असा एकूण ६३ हजाराचा मुद्देमाल चोरून पळ काढला.