‘भारत बंद’ ला नाशिककरांचा संमिश्र प्रतिसाद….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्यातसुद्धा भारत बंदचा संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठरोड परिसरातील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा शेतमाल बाजार समित्यांमध्ये पोहोचवला नाही. दिंडोरी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी करण्यात आली. तसेच दुसरीकडे काही ठिकाणी व्यावसायिकांनी आपले दुकानं खुली ठेवली होती.