भारतनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट ; मोठा अनर्थ टळला…

नाशिक (प्रतिनिधी) : इंदिरानगर परिसरातल्या भारतनगर येथे काल (दि.०१) एका खोलीत अचानक गॅसगळती होऊन स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये सहा युवक गंभीर जखमी झाले असून आगीचा मोठा भडका टळल्याने मोठा अनर्थ टळला.

भारतनगर रस्त्यावर असलेल्या झोपडपट्टीमध्ये सकाळच्या सुमारास गॅसगळती सुरु झाली. त्यानंतर अचानक गॅसचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की घराचे पत्रे सुद्धा उडाले. तसेच सिमेंट-विटांचे बांधकाम कोसळले. या स्फोटामुळे घरातील सहा युवक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.