भाजपचे आमदार कोरोनाबाधित! संपर्कात आलेल्या लोकांना केले हे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी) : चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉ आहेर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. अशी माहिती त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. ते म्हणतात, “थोडी शंका आली म्हणून काल कोरोना तपासणी केली, दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होईन आणि आपल्या सेवेत तत्पर होईन.”

त्यानंतर संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. ते म्हणाले, “गेल्या ७-८ दिवसात माझ्यावर प्रेम करणारे जे लोकं माझ्या संपर्कात आले त्यांना विनंती आहे की, आपण सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच काही त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्यावी.”