भांडण सोडवणाऱ्या व्यक्तीवरच काढला राग; लोखंडी रॉडने केली मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गाव परिसरात दोन चुलत भावांमध्ये भांडण सुरु होते. दरम्यान, तेथील स्थानिक रहिवाशी असलेली व्यक्ती त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी पुढे गेली असता, त्या दोघांनी मिळून त्यांनाच लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जालिंधर गणपत घोलप (वय ४७) हे घोलपवाडा देवळाली गाव येथे राहतात. (दि.१७ जानेवारी) रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास देविदास काशिनाथ घोलप (रा.घोलपवाडा, देवळाली गाव) व किरण दिपक घोलप (रा.देवळाली) हे दोघे भांडण करत होते. दरम्यान, फिर्यादी त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी गेले असता, संशयितांना राग आल्याने त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढली. त्यानंतर, संशयितांनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत गंभीर दुखापत केली असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.