ब्लूटूथ स्पिकर दिले नाही म्हणून चाकूने वार!

नाशिक (प्रतिनिधी) : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका युवकास ब्लूटूथ स्पिकर दिले नाही म्हणून चाकून वार करून गंभीर दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

किशन राजेंद्र जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मित्र किशन याने सागर शिंगाडे याच्याकडे ब्लूटूथ स्पिकर मागितला. मात्र सागरने स्पिकर न देता वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी सुरु झाली. सागरने चाकूने वार करण्याचा प्रतन केला असता किशनचा भाऊ मध्ये पडला. तेव्हा त्याच्या पोटाला चाकू लागल्याने गंभीर दुखापत झाली. याप्रकारणाविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.