ब्रिटनमधून आलेले सगळे प्रवासी अखेर सापडले

नाशिक (प्रतिनिधी): राज्य सरकारने नव्याने आलेल्या कोरोनामुळे ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांची पुन्हा चाचण्यांचे निर्देश दिले होते. यामुळे प्रवाशांची शोधाशोध सुरू होती. अखेर  महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला ९६ प्रवाशांचा शोध लावण्यात यश आले आहे.

आता आरोग्य विभागाला त्या प्रवाशांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.दरम्यान, यातील दोन पाॅझिटीव्ह रुग्णांना अहवाल येईपर्यंत १५ दिवस रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. जिल्ह्यात परत आलेले एकूण १२१ प्रवासी असून, त्यात ९६ प्रवासी हे महापालिका हद्दीतील होते. मात्र या ९६ प्रवाशांमधील १० प्रवासी सापडत नव्हते. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अखेर खूप प्रयत्नांती या दहा जणांचा शोध लावण्यात महापालिकेला यश आले आहे.