बिनविरोध निवडीचे राजकारण ; ६ प्रभागांना मिळाले नवे सभापती….

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रभाग समितीच्या निवडणुका आनलाइन पार पडल्या. प्रभाग समिती सभापतीपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आली.

तब्बल सहा महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुका अखेर गुरुवारी (दि.१५) रोजी बिनविरोध पार पडल्या.सातपूर प्रभागातून भाजपचे रविंद्र धिवरे, नाशिकरोड प्रभागातून शिवसेनेच्या जयश्री खर्जुल, पंचवटी प्रभागातून भाजपच्या शीतल माळोदे, पूर्वमध्ये अॅड. श्याम बडोदे, सिडको‌ प्रभागातून चंद्रकांत खाडे, तर पश्चिम प्रभागातून भाजपच्या वैशाली भोसले बिनविरोध निवडून आल्या.