बिटको रुग्णालयाची खाजगीकरणाकडे वाटचाल होणार…

नाशिक (प्रतिनिधी):  नाशिकरोड परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयाची दुरावस्था झाली असल्याच्या तक्रारी काल (दि.११) झालेल्या बैठकीत स्थायी समितीच्या सदस्यांनी मांडल्या. बिटको रुग्णलयात अपुरे मनुष्यबळ असल्याने उपचारासाठी अडचणी येत आहेत. रुग्णालयात पुरेसे डॉक्टर्स उपलबध नसल्याने वैद्यकीय कर्मचारी दाद देत नाहीत. नगरसेवकांच्या सूचनांनाकडे लक्ष दिले जात नाही अशा तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या.

तक्रारींची गांभीर्यता बघता सभापती गणेश गीते यांनी रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच रुग्णालयाचे व्यवस्थापन, एमआयआर, सिटी स्कॅन खाजगीकरणातून चालवण्यात येणार  असल्याचे सांगितले. एम्सच्या पार्शवभूमीवर सेवा पुरवण्यासह कोरोनासाठी सुसज्ज पूर्ण क्षमतेने रुग्णालयात खासगी व्यवस्थापन सुरु करण्यात येणार असून सर्व सामान्य तरी रुग्णांना प्राधान्य देण्यात येईल असे सभापती गीते यांनी सांगितले.

महानागरपालिकेच्या  बिटको रुग्णालयात विविध पदे रिक्त असून रुग्णलयातील एमआरआय, सिटी स्कॅन, एक्सरे सोनोग्राफी चालवण्यासाठी मनुष्य बाळ कमी असल्याने आणि कोरोनाच्या पार्शवभूमीवर सेवा विस्कळीत होऊन सेवांचा लाभ रुग्णांना मिळत नाहीये. म्हणून या सेवाचे खाजगीकरण करण्यात येत आहे असे गीते यांनी सांगितले.