पोलिसांनी अटक केलेल्या भोंदू बाबाच्या एक एक करामती…

नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी भोंदू बाबा ‘पाथर्डीवाला उर्फ बडे बाबा’ याला पोलिसांनी अटक केली होती. ह्या बाबाचे अजून काळे कारनामे उघडकीस आले आहेत. हा बाबा तंत्र मंत्राद्वारे पूजाविधींचा लोकांसमोर देखावा मांडण्यासाठी स्मशानभूमीतील अर्धवट जळालेल्या मानवी कवट्यांचा वापर करून लोकांची फसवणूक करत असल्याची धक्कादायक बाब समोर अली आहे.

ह्या भोंदू बाबाने या कामासाठी एजंट नेमलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एवढेच नाही तर बडे बाबाने १००८ महामंडलेश्वर हि पदवी स्वतः च्या नावासमोर लावून घेतली आहे. हि पदवी याला नेमकी कोणी दिली हा मोठा प्रश्न आहे. ह्या बाबाचे एजंट रात्रीच्या वेळी अंधारात स्मशानभूमीत जाऊन संबंधित व्यक्तीला पैसे देऊन बेवारस प्रेतांच्या कवट्या घेऊन पळ काढत असे. ह्या मानवी कवट्या जसे ग्राहक मिळतील तसे पूजा करण्यासाठी वापरात आणल्या जायच्या. या प्रकारचे अघोरी कृत्य करून बाबाने लोकांकडून लाखो रुपये उकळले आहेत.