नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील इंदिरानगर येथे राहणाऱ्या निवृत्ती भदाणे यांना आरोपीने “तुम्हाला लोन मिळवून देतो” असे सांगून तब्बल ४० लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पुण्यातील रहिवासी असून तेजिंदर नुरी आणि दगडू ताठे अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी संगनमत करून निवृत्ती यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
लोन मिळवून देण्यासाठी वेळोवेळी रक्कम स्वीकारत या आरोपींनी एकूण ४० लाख रुपये निवृत्ती यांच्याकडून घेतले. पैसे घेऊनही लोन मिळवून दिले नाही. त्यानंतर निवृत्ती यांनी दिलेले पैसे परत मागितले तर त्यांना पैसे परतही केले नाही. याप्रकरणात इंदिरा नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे हे करत आहेत.