फोटो काढण्याच्या मोहा पोटी १९ वर्षीय युवकाचा धबधब्यात बुडून मृत्यू !

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील ६ मित्र फिरण्यासाठी दुगारवाडी धबधबा येथे गेले असता, फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. दरम्यान, त्यांच्यातील एका युवकाचा फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी (दि.१० जानेवारी) रोजी आकाश पगारे (वय १९, रा.व्दारका, नाशिक) हा आपल्या ५ मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान, फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून आकाशचा पाण्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला. यांनतर आकाशच्या मित्रांनी सदर माहिती स्थानिक पोलिसांना दिली. मात्र, अंधार झाल्याने आकाशचा शोध घेता आला नाही.