पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या दोन नगरसेवकांना अटक

नाशिक (प्रतिनिधी) : अंबड औद्योगिक वसहतीतील एक्सलो पोइंट येथे शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झाला. ही बाब नगरसेवक राकेश दोंदे यांना समजतातच ते घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलीस कर्मचारी विष्णू गावित अपघाताची माहिती घेत होते. त्यांना या दोन नगरसेवकांसह उपस्थित असलेल्या दोघांनी धक्काबुक्की करत मारहाण केली.

अंबड औद्योगिक वसाहतीतील येथे सरकारी कामात अडथळा आणल्याने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवक राकेश दोंदे, नगरसेवक भागवत आरोटे, अमित आरोटे आणि अजय मिश्रा यांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे.