पोलिसांना माहिती दिली म्हणून युवकाला घरात घुसून मारहाण…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधल्या दिंडोरी रोडवरील राजदूतनगर परिसरात एका युवकाने भांडण झाल्याची पोलिसांना माहिती दिली म्हणून घरात घुसून मारल्याची घटना समोर आली आहे.

दिंडोरी रोड परिसरातील मायको हॉस्पिटलच्या मागे राहणाऱ्या रज्जाक जग्गू सय्यद, फिरोज आली सय्यद, सलीम विजू सय्यद, सिकंदर रज्जाक सय्यद आणि समाधान अहिरे या युवकांमध्ये अज्ञात कारणावरून भांडण सुरु होते. तेव्हा तेथेच जवळ राहणाऱ्या सोनू अशोक शर्मा या युवकाने त्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. म्हणून संशयितांनी बंद दरवाजावर लाथ मारून घरात घुसून सोनू याला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.