“पोलिसांना कोरोनापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक” – विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक विभागात ५ जिल्हे असून या जिल्ह्यांची जबाबदारी पोलीस महानिरीक्षकांवर असते. नाशिक परीक्षेत्रासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकपदी प्रताप दिघावकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

शनिवारी (दि.०५) रात्री मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांच्याकडून दिघावकर यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी ते म्हणाले “सध्या कोरोनाचा संसर्ग संपूर्ण नाशिक विभागात वाढत असून या संसर्गापासून पोलिसांना सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. म्हणून सरकारकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना पाचही जिल्ह्यांमध्ये पाळल्या जातील”