पोलिसांच्या वाहनाला मारला कट; जाब विचारणाऱ्या पोलिसालाच केली मारहाण !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील इंदिरानगर परिसरात पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. दरम्यान, एका इसमाने शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई शंकर दातीर हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत इंदिरानगर बोगद्याजवळ गस्त घालत होते. दरम्यान, रविवारी (दि.१० जानेवारी) रोजी सायंकाळी दुचाकीवरून (एमएच १५ एचई ६५९९) जाणाऱ्या नारायण लक्ष्मण सूर्यवंशी याने पोलिसांच्या वाहनाला कट मारला. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. याचा राग येऊन, संशयिताने पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.