पोलिसांची फास्ट कामगिरी; विनयभंग करणारा ताब्यात; महिला पोलिसास शिवीगाळ करणाऱ्यास अटक !

नाशिक (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी २२ डिसेंबर रोजी सायकल चालविणाऱ्या मुलीचा रस्त्यावर भरदिवसा विनयभंग केल्याची घटना घडली होती. तर २३ डिसेंबर रोजी महिला पोलिसास फोनद्वारे शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनांमधील दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी अवघ्या ४ ते ५ दिवसांमध्ये पाहिजे असलेल्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामुळे सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या हस्ते तपासी पथकाचा सत्कार करण्यात आला. पोलीस नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस महिलेस एका संतोष मोतीराम खिलारे नामक इसमाने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संशयित फिरस्ता असल्याने त्याला शोधणे अवघड होते. अखेर पथकाचे प्रशांत मरकड यांनी त्याला पाथर्डी फाटा येथे ताब्यात घेतले. तर सकाळी मैत्रिणीसोबत अंबड भागात सायकल चालवत असलेल्या मुलीच्या शाहिद गुलाम दस्तगीर (वय २३) नामक तरुणाने पार्श्वभागावर चापट मारल्याची घटना घडली होती. या प्रकणातील संशयित आरोपीस अंबड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू