पेठ रोडवर कंटेनरच्या धडकेत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): पेठ-गुजरात राज्य मार्गावर एका कंटेनरच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिक ग्रामीणमधील वांगणीफाटा येथे नाकाबंदी दरम्यान हेड कॉन्स्टेबल कुमार गायकवाड हे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना एका कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संशयित कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.