पेठ तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त!

नाशिक (प्रतिनिधी) : पेठ तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. त्यामुळे नाशिकमधला हा पेठ तालुका कोरोनामुक्त झाला आहे. पेठ तालुक्यात सुमारे १ लाख ३७ हजार लोकं राहतात. त्यामध्ये कोरोनाचे एकूण ९८ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आणि ४ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र आता पेठ तालुक्यात एकही कोरोनाबाधित नसल्याने पेठ तालुक्याने पुन्हा एकदा कोरोनामुक्त होण्याचा मान मिळवला आहे.