ज्‍येष्ठ तबलावादक व निवृत्त शिक्षक नवीन तांबट यांचे निधन

नाशिक (प्रतिनिधी) : ज्येष्ठ तबला वादक आणि पेठे हायस्कूलचे निवृत्त शिक्षक नवीन तांबट यांचे आज निधन झाले. त्यांचे वय ७० वर्षे होते.

काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट positive आला होता. म्हणून त्यांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची तब्येत अजुन जास्त खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. परंतु आज सकाळी ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.