पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना धडक देऊन बुलेटस्वार फरार !

नाशिक (प्रतिनिधी): पहाटेच्या वेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाईकलाच धडक देऊन आणि त्यांना जखमी करून एक जण फरार झाल्याची घटना २६ जानेवारीला पाहते १ वाजेच्या सुमारास घडली. पोलीस आता या धडक फरार झालेल्या संशयित आरोपीच्या मागावर आहेत.

२६ जानेवारी रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल कोतवाल आणि पोलीस शिपाई गंदलवाड हे रासबिहारी लिंक रोडने औदुंबर लॉन्सच्या दिशेने पेट्रोलिंग करत होते. याच वेळी एक लाल रंगाची बुलेट त्यांना ओव्हरटेक करून भरधाव वेगाने गेली. पोलीस कर्मचाऱ्यांना याचा संशय आल्याने त्यांनी बुलेटचा पाठलाग केला. झकास हॉटेलजवळ त्यांनी या बुलेटधारकास हाताने थांबण्याचा इशाराही केला. मात्र बुलेटस्वर न थांबला नाही आणि त्याने भरधाव वेगाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाईकला धडक मारली आणि फरार झाला. यात पोलीस कॉन्स्टेबल कोतवाल हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी अधिक तपास केला असता ही बुलेट या इसमाने चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले. बुलेट चोरीबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात या अज्ञात इसमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पोलीस त्याच्या मागवर आहेत.