पिण्याच्या पाण्यात सापडताय अळ्या! महापालिकेचा कानाडोळा…

नाशिक (प्रतिनिधी) :  नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपासून त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर अळ्या आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाची प्रशासक दखल सुद्धा घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पळसे गावात लगातार २ आठवड्यापासून अळीयुक्त, दूषित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करून देखील समस्येचे निवारण झालेले नाही. आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात पिण्याचे दूषित पाणी या दोन्ही समस्यांनी नागरिक बेजार झाले आहेत. म्हणून नागरिकांकडून याप्रकरणी समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी करण्यात येत आहे.