नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील पंचवटी परिसरातील हनुमानवाडी भागात एका वृध्द महिलेचा पायी जात असतानाच अकस्मात मृत्यू झाल्याची घटना काल (दि.२५) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
पंचवटी पोलीस ठाण्यात अभिजित माळोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेचे नाव माहित नाही. वय अंदाजे ६५ ते ७० आहे. अभिजित हे घराच्या दिशेने जात असतांना सदर महिला हनुमानवाडी परिसरात असलेल्या नगरपालिकेच्या गार्डनजवळून पायी जात होती. तेव्हा अचानक चक्कर आल्याने तिचा तोल गेला आणि टी खाली पडली. फिर्यादीने जवळ जाऊन पहिले असता महिलेची काहीएक हालचाल होत नव्हती. तसेच तिचा श्वासोच्छ्वास सुद्धा बंद होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाली म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.