पहिल्या टप्प्यात १० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देणार !

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीसाठी तयारी करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात साधारणपणे १० हजार कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. यात दोन हजार मनपाचे आरोग्य कर्मचारी, सहा हजार खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्स व कर्मचारी आहेत.

या लसीसाठी आतापर्यंत सहा हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलिस व अन्य लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. व याच दृष्टीने शासनाने माहिती मागवली आहे. कोरोनावरची ही लस कधी उपलब्ध होणार याची माहिती नसली तरी त्या दृष्टीने सगळी तयारी सुरू आहे. यावर महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी बैठक घेऊन लसीकरणाचा आढावा घेतला.