पत्नीला पळवणाऱ्या प्रियकराचा खून!

नाशिक (प्रतिनिधी):  आभाळवाडी परिसरात राहणाऱ्या विवाहित स्त्रीसोबत प्रेमसंबंध ठेवून २ महिन्यांपूर्वी तिला पळवून घेऊन जाण्याचा राग येऊन पतीने प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. गंगापूर धरणाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी एका मृतदेहाची ओळख होऊन, तालुका पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

नितीन टबाले (रा.हरसूल) याचा मृतदेह सावरगाव शिवारात गंगापूर धरणाच्या परिसरातील पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागी आढळून आला होता. म्हणून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिस ठाण्यामधील शिपाई विक्रम कडाळे यांना मयत नितीन याचे आभाळवाडीतील एका विवाहित स्त्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचे धागेदोरे मिळाले होते. व नितीन मागील दोन महिन्यांपासून त्या विवाहित स्त्रीसोबत राहत होता. म्हणून तिच्या पतीने नितीनचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित आरोपी अशोक मोरेला पोलिसांनी अटक केली असून,चौकशीदरम्यान अशोकने गुन्हा कबूल केला आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू