पंचवटीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण…

पंचवटीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून गेलेल्या दोन मैत्रिणी बेपत्ता झाल्याची घटना पेठरोडवर उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत तळेनगर येथील मैत्रिणीकडे जाऊन येतो असे सांगून गेल्या होत्या. सायंकाळी त्यांनी फोन करत सांगितले की आम्ही लवकरच येतो व त्यानंतर फोन बंद केला. तेव्हापासून मुलींचा फोन बंद आहे. मुलींना फुस लाऊन पळून नेल्याची तक्रार दिल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक अशोक साखरे तपास करत आहे.