नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे दगावलेल्या रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराची वेळ येते तेव्हा शहरातल्या एकमेव विद्युत दाहिनीवर ताण येतो. त्यासोबतच एका मृतदेहाच्या दहनासाठी विद्युत दाहिनीला किमान दोन तासांचा कालावधी लागतो. कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या मृतदेहासोबतच इतर आजाराने दगावलेल्या मृतदेहांचासुद्धा समावेश असतो. त्यामुळे एका मृतदेहाच्या दहनासाठी आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागते. गेल्या काही दिवसांपासून अमरधाममध्ये आणखी एक विद्युत शवदाहिनी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या संचालक मंडळाच्या काल (दि.२६) झालेल्या बैठकीत पंचवटी अमरधामसाठी आणखी एका विद्युत शवदाहीनीला मंजुरी देण्यात आली.
पंचवटीतील विद्युत दाहिनी वरचा ताण कमी…
2 years ago