नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): शिपींग कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखून नऊ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शाहू प्रमोद शिंदे ( रा. मखमलाबाद रोड पंचवटी ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर रोड, आनंद नगर या ठिकाणी टिएमसी शिपिंग प्रशिक्षण केंद्र आहे. या कंपनीत जॉबला लावून देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी प्रशिक्षणाला लागणार खर्च म्हणून माझ्याकडून वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यानुसार २० ऑक्टोबर २०१७ ते आता पर्यंत रोकड रक्कम आणि धनादेशाद्वारे   नऊ लाख ३० हजार रुपये घेतले आहेत. सुरुवातीला ७० हजार रोख रक्कम भरून चंदीगड येथे प्रशिक्षणाला पाठ्वणात आले. प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाण पत्र मिळाले. उर्वरित पुढील प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रलियाला जावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी १५ हजार भरले आणि १० जून २०१९ रोजी नोकरी लावून देतो असे सांगून ४ लाख ५० हजार रुपयेही घेतले. हरियाणाच्या पंचकुला येथील कंपनीच्या मुख्य कार्यलयात गेल्या नंतर त्या ठिकाणी एक महिना थांबून कंपनीचे बनावट कंत्राट पत्र देऊन विमानाचे खोटे तिकीट दिले. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. कंपनीतील सविता दगडू गायकवाड यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फोन बंद करून पैसे देण्यास टाळाटाळ केली. यावरून सविता गायकवाड आणि कंपनी विरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.